सर्वसामान्यांसाठी घरांची निर्मिती करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘म्हाडा’चा २०१४-१५ चा अर्थसंकल्प जाहीर झाला असून यावर्षी ५४६३ घरांचे बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी २२३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सरत्या वर्षी घरांची विक्री प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ७५७ कोटी रुपये तिजोरीत जमा होऊ शकले नाहीत. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प १२३४ कोटी रुपये तुटीचा आहे.
मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ५७६० घरांचे बांधकाम हाती घेण्याचे ठरवण्यात आले होते. त्यासाठी १७१६ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले होते. सुधारित अंदाजानुसार ६९१३ घरांसाठी ११७८ कोटी रुपये खर्चाची अपेक्षा आहे.
२०१४-१५ च्या अर्थसंकल्पात भूसंपादन व भूविकासासाठी ४९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात
आली आहे.