मुंबई : कोन, पनवेलमधील घरांसाठीच्या ८०० हून अधिक पात्र गिरणी कामगारांच्या गृहकर्जाचा हप्ता सुरू झाला आहे. उर्वरित पात्र कामगारांकडून घरांची संपूर्ण रक्कम भरून घेण्यात येत आहे. मात्र या पात्र कामगारांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने या घरांचा ताबा सहा महिन्यानंतर मिळेल असे कामगारांना लेखी कळविले आहे. त्यामुळे कामगारांची घरासाठीची प्रतीक्षा वाढली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहयोजनेतील गिरणी कामगारांसाठीच्या २,४१८ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली होती. या सोडतील घरांचा ताबा कामगारांना यापूर्वीच मिळणे अपेक्षित होते. मात्र ही घरे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी करोनाबाधित रुग्णांच्या अलगीकरणासाठी घेतली. नोव्हेंबर २०२१ मध्ये या घरांचा ताबा एमएमआरडीएकडे आणि त्यानंतर म्हाडाकडे आला. दुरवस्था झालेली ही घरे काही महिन्यांपूर्वी मुंबई मंडळाच्या ताब्यात आली असून त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. या घरांची दुरुस्ती मुंबई मंडळ करणार असून त्याचा खर्च एमएमआरडीएला द्यावा लागणार आहे.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Scheme for women Assemblies Candidates for women Prime Minister Narendra Modi
पहिली बाजू: महिला सशक्तीकरणाची नवी पहाट

हेही वाचा : मुंबई : बालसुधारगृहातून पळालेल्या मुलाला पोलिसांनी तीन तासांत पकडले

घरांच्या दुरुस्तीचा निर्णय मे महिन्यात झाला असून सप्टेंबर महिना उजाडला दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कामगारांना घराचा ताबा मिळण्यासाठीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई मंडळाने पात्र कामगारांना घराची उर्वरित रक्कम भरण्यासाठी पत्र पाठविले असून त्यात घराचा ताबा सहा महिन्यांनी मिळेल असे स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. यामुळे कामगार प्रचंड नाराज असून आणखी किती दिवस वाट पाहायची आणि सरकारी यंत्रणांच्या चुकीची फटका आम्ही का सोसायचा असा सवाल कामगार करीत आहेत. तसेच दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घराचा ताबा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा : “मोदींनी मंदिरं बंद केली, मग ते मुघलांचं सरकार होतं का?”; शिवसेनेचा हल्लाबोल

अनेक कामगारांचा गृहकर्जाचा हप्ता वर्षभरापासून सुरू आहे. आताही पात्र कामगारांकडून रक्कम भरून घेतली जात आहे. पण घराचा ताबा देण्यात आलेला नाही. म्हाडाकडून विलंब होत असून त्याचा भुर्दंड कामगारांना सोसावा लागत आहे. घरांच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार होती, तर रक्कम भरण्यासाठी घाई का केली. म्हाडाने त्वरित घरांच्या दुरुस्तीला सुरुवात करावी आणि ताबा द्यावा. – प्रवीण येरूणकर, सरचिटणीस, गिरणी कामगार संघर्ष समिती

हेही वाचा : स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकूड पुरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

या घरांच्या दुरुस्तीचे काम दोन महिन्यांनी सुरू होईल. तसेच काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन – चार महिने लागतील. मात्र काही कामगारांनी घरांची १०० टक्के रक्कम भरली आहे. त्यांच्या घरांची दुरुस्ती प्राधान्याने पूर्ण करून शक्य तितक्या लवकर त्यांना त्याचा ताबा देण्यात येईल, असे मुंबई मंडळतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.