राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असली तरी अजूनही राज्याच्या काही भागात लपून-छपून प्लास्टिक पिशव्यांमधून वस्तूंची सर्रास विक्री सुरु आहे. बुधवारी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्वत: प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात धाड टाकून दंडात्मक कारवाई केली.
प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात प्लास्टिकच्या बॅगेतून भाविकांना प्रसाद व फुले देणाऱ्या दुकानदारांवर पर्यावरणमंत्री @iramdaskadam यांनी स्वत धाडी टाकून केली दंडात्मक कारवाई#plasticban pic.twitter.com/IIA15mhuxd
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 26, 2018
इथे मंदिर परिसरातील काही दुकानदार प्लास्टिकच्या पिशवीतून भाविकांना प्रसाद व फुले देत होते. रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदींच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या या दुकानदारांवर स्वत:हा दंडात्मक कारवाई करुन त्यांना समज दिली.