पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. घोडा हे शनिवारी रात्री मनोरजवळ एका लग्नसोहळ्यासाठी गेलेले होते. तेथून घरी परतत असताना त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या. घोडा यांना वापीमधील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
१९८८ साली पहिल्यांदा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांआधी कृष्णा घोडा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. कृष्णा घोडा हे पालघरमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार होते. आतापर्यंत ते चारवेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते. अलीकडेच झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बाजी मारत त्यांनी बँकेचे उपाध्यक्षपद पटकावले होते.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2015 रोजी प्रकाशित
शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे निधन
पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

First published on: 24-05-2015 at 10:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla krushna ghoda passes away