नागरिकांची फसवणूक टळणार

मुंबई : बोगस डॉक्टरांना आळा बसावा आणि सर्वसामान्य नागरिकांना नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेने (एमएमसी) विशेष अॅप तयार केले आहे. या ॲपवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या डॉक्टरांना एक क्यूआर कोड देण्यात येणार आहे.

हा क्यूआर कोड क्लिनिकच्या बाहेर लावणे बंधनकारक ठरणार असून तो स्कॅन करताच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना संबंधित डॉक्टरची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे डॉक्टर नोंदणीकृत असल्याची खात्रीही करून घेता येणार आहे.

bombay high ourt remark on delay in building repairing
इमारत दुरुस्तीतील विलंब हा छळच ! उच्च न्यायालयाची टिप्पणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
salman khan shahrukh khan
सलमानपाठोपाठ शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी, ५० लाखांच्या खंडणीची मागणी!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
tension in malad aksa village over rehabilitation of ineligible residents of dharavi
जमीन मोजणीला विरोध; अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनावरून मालाड अक्सा गावात तणाव

बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेने एक विशेष ॲप तयार केले आहे. यामध्ये परिषदेकडे नोंदणी असलेल्या सर्व डॉक्टरांची नोंद करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेकडे राज्यभरातील एक लाख ९० हजार डॉक्टरांची नोंद आहे. या सर्व डॉक्टरांची ऑनलाईन नोंदणी विशेष ॲपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> जमीन मोजणीला विरोध; अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनावरून मालाड अक्सा गावात तणाव

नोंदणीत लवकरच वाढ

आतापर्यंत यातील १ लाख ३४ हजार डॉक्टरांनी अॅपवर नोंदणी केली असून उर्वरित डॉक्टरांची नोंदणीही लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेकडे ऑनलाईन करण्यात येत असलेल्या नोंदणीमध्ये अद्यापपर्यंत जवळपास ३६ हजार डॉक्टरांची नोंदणी झालेली नाही. यामध्ये काही नोंदणीकृत डॉक्टर हे विविध कामासाठी किंवा वैद्याकीय कामासाठी परदेशात गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना नोंदणी करता आलेली नाही. मात्र ते परेदशातून आल्यावर नोंदणी करू शकतात. तसेच काही डॉक्टरांचे वय झालेले असल्याने त्यांनी नोंदणी केली नसल्याने सर्व १ लाख ९० हजार डॉक्टरांची नांदणी होऊ शकलेली नाही. मात्र पुढील काही दिवसांमध्ये नोंदणीच्या आकड्यामध्ये निश्चितच वाढ होईल, अशी माहितीही डॉ. विंकी रुघवानी यांनी दिली.

हेही वाचा >>> मुंबई : ऑनलाईन वस्तू विकणे महागात, महिलेला लाखोंचा गंडा

मोबाईलवर मिळणार माहिती नोंदणी केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेकडून एक क्यूआर कोड देण्यात येणार असून हा क्यूआर कोड त्यांना त्यांच्या क्लिनिकच्या बाहेर लावणे बंधनकारक आहे. क्लिनिकमध्ये येणारा रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाने आपल्या मोबाईलद्वारे हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्याची सविस्तर माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये डॉक्टरने घेतलेले शिक्षण, त्याचा नोंदणी क्रमांक, त्यांच्या सदस्यात्वाची अंतिम तारीख अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टर नोंदणीकृत असून, बोगस नसल्याची माहिती रुग्णांना मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी दिली

Story img Loader