मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऐरोली काटई नाक्यादरम्यानच्या टेकडीचा परिसर आणि ऐरोली काटई नाका उन्नत रस्त्यावरील प्रवास सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील टेकडीवरून भूस्खलन होण्याचा धोका असून हा धोका टाळण्यासाठी टेकडीलगत संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई: एक लाख नागरिकांना दिली इन्फ्ल्यूएंझाची मात्रा

‘एमएमआरडीए’ने नवी मुंबई आणि डोंबिवलीदरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी १२.३० किमी लांबीच्या ऐरोली – काटई नाका उन्नत मार्गाचे काम हाती घेतले आहे. ऐरोली – डोंबिवलीमधील अंतर थेट १० किमीने कमी करणाऱ्या या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात करण्यात येत आहे. ऐरोली – काटई प्रकल्प पूर्ण झाल्यास नवी मुंबई – डोंबिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत पार करता येणार आहे.

हेही वाचा >>> थलायवा मातोश्रीवर! सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, फोटो शेअर करत आदित्य म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकल्पामुळे नवी मुंबई – डोंबिवली प्रवास वेगवान होणार आहे. पण त्याचवेळी हा प्रवास सुरक्षित करण्याचे आवाहन एमएमआरडीएसमोर होते. या मार्गादरम्यान एक टेकडी असून पावसाळ्यात ही टेकडी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडण्याचीही भीती आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने पश्चिम द्रुतगती मार्गावरील बाणडोंगरी परिसरातील टेकडीदरम्यान संरक्षक भिंत उभारली आहे. तशीच संरक्षक भिंत येथे उभारण्यात येणार असल्याचे ‘एमएमआरडीए’मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासंबंधीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने मंजुरी दिली आहे. आता लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या कामासाठी अंदाजे ७३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर हे काम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. या संरक्षक भिंतीमुळे टेकडीचा परिसर आणि ऐरोली काटई नाका उन्नत रस्त्यावरील प्रवास सुरक्षित होणार आहे. त्यामुळे हा निर्णय प्रवाशांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.