गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. त्यानंतर दोन्ही गटांनी ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हावर दावा सांगितला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच या वादावर प्रतिक्रिया दिली.

दोन्ही गटांत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हावरून वाद सुरू झाला, तेव्हा खूप वेदना होत होत्या, असं विधान राज ठाकरे यांनी केलं. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून चौफेर टीका केली.

हेही वाचा- “राज ठाकरेंविरोधात षडयंत्र करून…”, पाडवा मेळाव्यातून संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले,”गेल्या दोन वर्षांपासून आपण महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा सगळा खेळ आणि बट्याबोळ सर्वच पाहत आहोत. हे सगळं राजकारण पाहात असताना मला वाईट वाटत होतं. पण ज्यावेळी ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे तुझं की माझं? माझं की तुझं? यावरून वाद सुरू झाला. तेव्हा वेदना होत होत्या. लहानपणापासून मी तो पक्ष पाहात आलो आहे. मी तो पक्ष जगलो.”