कल्याणमधील बिर्ला स्कूलमध्ये मराठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात शाळा व्यवस्थापन चालढकल करीत असल्याचा आरोप करीत बुधवारी मनसेचे कल्याणमधील आमदार प्रकाश भोईर व त्यांचे कार्यकर्त्यांनी शाळेत धुडगूस घातला़ शाळेच्या मुख्याध्यापक, व्यवस्थापनाने भेट देण्यास टाळाटाळ केल्याने संतप्त आमदार समर्थकांनी व्यवस्थापक विजय टोकावडे यांनाही बेदम मारहाण केली.
याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. आमदार प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष रवींद्र भोसले, नगरसेवक उल्हास भोईर, गणेश चौधरी व अनिल कर्पे यांना पोलिसांनी अटक करण्यात आली़ मात्र न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली आह़े बिर्ला स्कूलमध्ये फक्त धनदांडग्या विद्यार्थ्यांना देणग्या घेऊन प्रवेश दिला जातो. सामान्य मराठी विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश नाकारण्यात येत असल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी आमदार प्रकाश भोईर यांच्याकडे केल्या होत्या. शाळेने प्रवेश देताना कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करू नये. पारदर्शकपणे व देणग्या न घेता प्रवेश देण्याची मागणी यापूर्वी व्यवस्थापनाकडे केली होती. व्यवस्थापनाने असे काही होणार नाही असे आश्वासन आमदारांना दिले होते. पालकांच्या तक्रारी कमी होत नव्हत्या.
बुधवारी सकाळी आमदार भोईर कार्यकर्त्यांसह शाळेत गेले. तेथे मुख्याध्यापिका आहेत का, अशी विचारणा केली असता, त्या आल्या नाहीत असे उत्तर देण्यात आले. मस्टरवर मुख्याध्यापकांनी सही केली होती. शाळेतील कोणीही अधिकारी आमदारांना भेटण्यास तयार नव्हता. शाळेतून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शाळेतील दरवाजे, खिडक्या, खुच्र्याची तोडफोड केली. आमदार भोईर यांनी सांगितले की, शाळा दुजाभाव करून विद्यार्थ्यांना प्रवेश देते. स्थानिक विद्यार्थ्यांना डावलले जाते. उल्हासनगर व इतर शहर विद्यार्थ्यांना देणग्यांच्या बळावर प्रवेश दिले जातात. पालक वर्ग याबाबत संतप्त आहे. तो उद्रेक मनसेने शाळेला दाखवून दिला. शाळेने पारदर्शकपणे प्रवेश प्रक्रिया करावी अशी आमची मागणी आहे.
आमदार भोईर यांचे सर्व आरोप फेटाळत शाळा व्यवस्थापनाने म्हटले आहे, प्रवेश देताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जातो. कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. शाळेत येण्यापूर्वी आमदारांनी शाळेला पूर्वकल्पना दिली नव्हती. व्यवस्थापन कोटय़ातून
आमदारांना प्रवेश देता येत नाही. हे सहन झाल्याने शाळेत तोडफोड करण्यात आली, असा आरोपही शाळेकडून करण्यात
आला आह़े
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2014 रोजी प्रकाशित
कल्याण बिर्ला स्कूलमध्ये मनसेची तोडफोड
कल्याणमधील बिर्ला स्कूलमध्ये मराठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात शाळा व्यवस्थापन चालढकल करीत असल्याचा आरोप करीत बुधवारी मनसेचे कल्याणमधील आमदार प्रकाश भोईर व त्यांचे कार्यकर्त्यांनी शाळेत धुडगूस घातला़
First published on: 29-05-2014 at 07:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns damages kalyan birla school