शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेत ध्वनी प्रदूषण होऊ देऊ नका अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल, असे उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निर्माण सेनेला बजावले होते. मात्र त्यानंतरही पक्षातर्फे ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे हेतूत: आणि जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे, असे नमूद करत उच्च न्यायालयाने सभेचे आयोजक आणि मनसे नेते नितीन सरदेसाई यांना शुक्रवारी अवमान नोटीस बजावली. एवढेच नव्हे, तर शांतता क्षेत्र असलेल्या शिवाजी पार्कवर ही सभा घेण्यास सशर्त परवानगी देणाऱ्या पालिका आणि पोलिसांनीही याप्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सभेदरम्यान आणि त्याच्या आधी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही यावर देखरेख ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले
होते.
वाशी खाडीत मृतदेह
मुंबई: आपल्या मुलाचे आजाराने निधन झाल्याच्या तणावाखाली आत्महत्या केलेल्या अशोक बाईत (५५) यांचा मृतदेह शुक्रवारी खाडीत सापडला. १४ एप्रिलला मुलीला भ्रमणध्वनीहून संपर्क करून आपण आत्महत्या करत असल्याचे बाईत यांनी सांगितले. त्यानंतर बाईत यांचा भ्रमणध्वनी बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला.