अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी आपल्याला कार्यालयात बोलावून आपला विनयभंग केल्याची तक्रार एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने केली आहे. या ३२ वर्षीय महिलेने कुलाबा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली.
ही महिला पोलीस मुख्यालयात कार्यरत असून संबंधित अधिकाऱ्याने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल तिच्याकडे विचारणा केली होती. त्यानंतर तिचा मोबाइल क्रमांक घेऊन त्याने तिच्यासह आक्षेपार्ह संवाद साधला. सोमवारी सकाळी या अधिकाऱ्याने महिलेला आपल्या दालनात बोलावून तिच्यासह असभ्य वर्तन केल्याचे तिने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
पोलीस या तक्रारीबाबत तपास करत आहेत. या तक्रारीची शहानिशा करत असल्याचे कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर सुपळे यांनी सांगितले. आम्ही या महिलेच्या मोबाइलवरील फोन रेकॉर्ड तपासत आहोत, असे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2015 रोजी प्रकाशित
अतिरिक्त पोलीस महासंचालकांविरोधात विनयभंगाची तक्रार
अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी आपल्याला कार्यालयात बोलावून आपला विनयभंग केल्याची तक्रार एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने केली आहे.
First published on: 18-02-2015 at 01:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Molestation complaint against additional director general of police