मुंबईतील पावसाळी आजरांचा विशेषतः स्वाईन फ्लूचा भर ओसरू लागला आहे. मात्र हिवताप आणि डेंग्यूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्वाईन फ्लूचे केवळ तीन रुग्ण आढळले आहेत. मात्र हिवतापाच्या ८९रुग्णांची नोंद झाली.
करोनाचा धोका ओसरत असला तरी यंदा स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण होते. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात ८० रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभागही सतर्क झाला होता. मात्र नंतर ही रुग्णसंख्या ओसरू लागली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ४ तारखेपर्यंत केवळ तीन नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे स्वाईन फ्लूचा भर ओसरत असल्याचे चित्र आहे. यावर्षी आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ३०१ रुग्ण आढळले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा >>> मुंबई : गौरी-गणेशाला निरोप ; ४८ हजारांहून अधिक गौरी-गणपतींचे विसर्जन
दरम्यान, हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मात्र वाढत आहे. या आठवड्यात हिवतापाचे ८९रुग्ण आढळले तर डेंग्यूचे २९ नवीन रुग्ण आढळले. गॅस्ट्रोच्या ३८ रुग्णांचीही नोंद झाली आहे. लेप्टोचे ६, काविळचे ४ रुग्ण आढळले आहेत.
आजार सप्टेंबर महिन्यातील रुग्ण जानेवारीपासून आतापर्यंतचे एकूण रुग्ण
हिवताप(मलेरीया) ८९ २६८१
लेप्टो ६ १६९
डेंग्यू २९ ३८२
गॅस्टो ३८ ४०९०
कावीळ (हेपेटायटीस) ४ ३७३
चिकुनगुन्या १ ११
स्वाईन फ्लू ३ ३०१