मुंबईः गोरेगाव (पूर्व) येथील ४५ मजली इमारतीवरून उडी मारून १७ वर्षीय मुलीने मंगळवारी आत्महत्या केली. याप्रकरणी कुटुंबियांनी कोणताही संशय व्यक्त न केल्यामुळे आरे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

गोरेगाव (पूर्व) येथील एका इमारतीच्या ४५व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ती मुलगी आंतरराष्ट्रीय शाळेतील इयत्ता अकरावीत शिकत होती. पोलीस तपासात तिच्या बॅगेत चिठ्ठी सापडली असून त्यात आत्महत्या करत असल्याचे नमुद करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हा माझा निर्णय आहे, त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही मुलीने चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या सहा वर्षांपासून नैराश्यग्रस्त होती. त्याबाबत उपचार सुरू होते. मुलीच्या वडिलांचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. त्यात मुलीने यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिच्यावर उपचार सुरु होते, असे सांगितले. सगळ्यांनाच शेवटी मरायचं आहे, मग आपण का जगत आहोत? असे मुलीने एकदा मानसोपचार तज्ज्ञांला सांगितले होते. पोलिसांनी वडिलांचा जबाब नोंदवला असून पोलिसांना कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.