मुंबईः पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पीडित मुलगी घराशेजारी खेळत असताना आरोपीने तिला उचलून आपल्या घरी नेले व तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – वेब मालिकेच्या नावाखाली हरियाणातील व्यावसायिकाची फसवणूक

हेही वाचा – ईडीचे मुंबई, कर्जत, बारामती व पुण्यात छापे, श्री शिव पार्वती साखर कारखाना व संचालकाविरोधातील प्रकरणात कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी २७ जुलै रोजी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने तिच्याजवळ कोणी नसल्याचे पाहून तिला उचलले व आपल्या घरी नेले. त्यानंतर तिच्याशी अश्लील कृत्य केले. पीडित मुलीच्या ओठांवर जखम पाहून मुलीला तिच्या आईने विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६५(२) व बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर राहत्या घरातून पोलिसांनी आरोपीला मंगळवारी अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.