मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आता २३ मेपासून या पुलावरून बसगाड्याही धावणार आहेत. गेली तब्बल सात वर्षे बंद असलेले बसमार्ग येत्या शनिवारपासून सुरू होणार आहेत. बेस्ट प्रशासनाने शनिवार २३ मेपासून ए ३५९, ए ४२२ व ४२४ हे बसमार्ग पुन्हा गोखले पुलावरून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोखले पूल दुरुस्तीसाठी बंद केल्यानंतर या मार्गावरून जाणारे तब्बल १० बसमार्ग गेल्या सात वर्षांपासून बंद करण्यात आले आहेत. तर काही मार्ग पर्यायी रस्त्याने वळवण्यात आले आहेत. गोखले पूल सुरू झाल्यानंतर हे मार्ग पुन्हा सुरू करावे, अशी मागणी रहिवासी करीत होते. या पुलाच्या पादचारी मार्गाचा भाग २०१८ मध्ये पडला. तेव्हापासून हा पूल बंद करण्यात आला होता. आता या पुलावरून तीन बसमार्ग सुरू करण्यात येणार आहेत.

गेल्यावर्षी पुलाची एक मार्गिका सुरू झाली तरी अवजड वाहने आणि बसमार्ग सुरू झाले नव्हते. हे बसमार्ग तब्बल सात वर्षांपासून बंद आहेत. मात्र आता पूल सुरू झाला असून पुलावरील सगळे उंची अटकाव हटवल्यामुळे बसमार्ग पुन्हा सुरू करावे, अशी मागणी अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेने बेस्ट उपक्रमाकडे केली होती. या पुलावरील उंची अटकाव हटवल्यानंतर वाहतूक पोलिसांनी पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवार, २३ मेपासून बेस्टने ए ३५९, ए ४२२ व ४२४ हे बसमार्ग पुन्हा गोखले पुलावरून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .

गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्यानंतर यावरील बस सेवा इतर मार्गानी वळवण्यात आली होती, तर काही बसमार्ग खंडित करण्यात आले होते. दुसरा काहीच पर्याय नसल्याने तीन बसमार्ग पूर्णतः बंद करावे लागले होते. हा महत्त्वाचा पूल बंद केल्याने पूर्व – पश्चिम प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. शिवाय वाहतूक कोंडीत भर पडली होती.

हे मार्ग सुरू होणार

ए ४२२- वांद्रे आगार – विक्रोळी आगार

ए ३५९ – हिरानंदानी (पवई ) बस स्थानक – मालवणी आगार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४२४ – गोरेगांव आगार – मुलुंड स्थानक (पश्चिम)