Mumbai Best Bus Accident News : मुंबईतील कुर्ला परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव बेस्टच्या बसने अनेकांना धडक दिली आहे. या अपघातामध्ये १७ जण जखमी झाले असून ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर लगेच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बेस्टच्या बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातील एलबीएस रोड या ठिकाणी ही घटना घडली आहे. या परिसरामधून ही बस जात असताना बस चालकाने भरधाव बस चालवल्याने अनेकांना धडक बसली. या अपघातात जवळपास १७ जण जखमी झाले आहेत. तसेच ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ

दरम्यान, या अपघातात काही गाड्यांचा देखील चक्काचूर झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंत अवस्थेत असल्याचा आरोप देखील आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला असून पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

वर्षा गायकवाड यांचं ट्विट काय?

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेनंतर ट्विट करत म्हटलं आहे की, “हे अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आणि जखमींसाठी प्रार्थना. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच बाधित कुटुंबांना शक्य तितकी मदत मिळायला हवी, अशी मागणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार मंगेश कुडाळकर काय म्हणाले?

“या घटनेतील जखमी झालेल्यांना वाचवण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. तसेच या घटनेसंदर्भात प्रशासनाला आणि पोलिसांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे”, असं आमदार मंगेश कुडाळकर यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.