मुंबईतील बेस्टच्या चालक-वाहकांनी मंगळवारी सुरू केलेले काम बंद आंदोलन बेकायदा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. चालक आणि वाहकांनी तातडीने कामावर रूजू व्हावे, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
बेस्ट प्रशासनाने एक एप्रिलपासून कॅनेडियन डय़ुटी पद्धत लागू करण्याचा निर्धार केल्यामुळे संतप्त झालेले चालक-वाहकांनी मंगळवारी कामावर दांडी मारून आंदोलनास सुरुवात केली. दरम्यान, कामावर रूजू न होणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. बेस्ट कागमारांच्या कामबंद आंदोलनामुळे मुंबईत सकाळपासून एकही बस रस्त्यावर दिसलेली नाही. मात्र, यामुळे मुंबईकर त्रस्त झाले असून परीक्षेचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांचेही हाल झाले आहेत.
फोटो गॅलरी : बेस्ट’चे कामबंद सुरूच

कॅनडियन वेळापत्रक हे कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्यासाठी तयार केल्याचा आरोप कामगार संघटेनेचे नेते शरद राव यांनी केला आहे. दरम्यान, हा संप नसून कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे त्यांनी स्वेच्छेने घेतलेला निर्णय असल्याचा दावा शरद राव यांनी केला आहे.
चार तास काम, चार तास आराम आणि पुन्हा चार तास काम, अशा प्रकारच्या जाचक वेळापत्रकामुळे अनेक कर्मचाऱ्यांची प्रकृती ढासळत असल्याची तक्रारही शरद राव यांनी केली.
“गेले तीन दिवस बेस्ट कर्मचाऱयांकडून अतिरिक्त काम करुन घेत आहे. अतिकामामुळे कर्मचाऱयांना हृद्यविकाराच्य समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे जोपर्यंत कामाची नवी कॅनेडियन पद्धती मागे घेतली जात नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील” असा इशाराही शरद राव यांनी दिला आहे.
बेस्टमधील सरसकट सर्वच चालक-वाहकांना ‘चार तास काम – चार तास आराम – चार तास काम’ अशी १२ तासांची कॅनेडियन पद्धतीची डय़ुटी एक मार्चपासून लागू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला होता. ‘दि बीईएसटी वर्कर्स युनियन’ने त्यास विरोध करून काही फेरबदल करण्याची मागणी केली होती. मात्र कोणतेही फेरबदल न करता आता एक एप्रिलपासून नवी पद्धत अवलंबण्याचा घाट प्रशासनाने घातला होता. त्याविरोधात युनियनने कामगार न्यायालयात धाव घेतली होती. प्रशासनाने त्याविरोधात उच्च न्यायालयात अपिल केले होते. उच्च न्यायालयाने या संदर्भात निकाल देण्याचे आदेश कामगार न्यायालयाला दिले होते. त्यानुसार कामगार न्यायालयाने एक एप्रिलपासून कॅनेडियन पद्धत लागू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र चालक- वाहकांची डय़ुटी १० तास करावी, तसेच विश्रांती, उपाहारगृह, प्रसाधनगृहाची उत्तम सोय उपलब्ध करावी, असे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहे. दोन महिन्यांमध्ये या सर्व सुविधा बेस्टने उपलब्ध कराव्यात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने एक एप्रिलपासून ही पद्धत अमलात आणण्याचा चंग बांधला आहे. रविवार आणि सोमवारी वाहक- चालकांना नवे हजेरी पत्रक देण्यात येत आहे. मात्र अनेकांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आहे. सकाळी आल्यानंतर पहिल्यांना लांबपल्ल्याच्या मार्गावर चालक-वाहकांना जावे लागणार आहे. खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे चार तासांत नियोजितस्थळी पोहोचणे अवघड आहे. परिणामी विश्रांतीची वेळ कमी होईल. तसेच दररोज वेगवेगळ्या बस मार्गावरील काम करताना बस थांबे आणि तिकीटाचे दर याबाबत चालक-वाहकांचा गोंधळ उडण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे कॅनेडियन पद्धतीला चालक-वाहकांकडून विरोध करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवार आणि सोमवारी बहुतांश चालक -वाहकोंची रजा होती. त्यामुळे आतापर्यंत २० टक्के चालक -वाहकोंनी नवे हजेरीपत्रक स्वीकारले आहे. कामावर रूजू झाल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांना हजेरीपत्रक देण्यात येईल. मात्र कामावर गैरहजर राहणाऱ्या चालक -वाहकोंवर कोयदेशीर कोरवाई करण्यात येईल, असा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे.