मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा विभागात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली आहे. दरम्यान, केंद्रावर मतदान यादी क्रमांकामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

भायखळा येथील एका मतदान केंद्रावर एकूण ७६ ते ८६ असे दहा मतदान यादी क्रमांक आहेत. केंद्रावर यादी क्रमांकांचे तपशील लावण्यात आल्यानुसार मतदारांच्या रांगा लावण्यात येत आहेत. मात्र, दहा रांगा असल्यामुळे त्याही एका पाठोपाठ एक किंवा बाजूला असल्याने मतदारांना त्यांच्या मतदार यादी क्रमांकाच्या रांगेची विचारपूस करावी लागत आहे. काहीजण दिसेल त्या रांगेत म्हणजेच चुकीच्या रांगेत उभे राहत आहेत. गर्दी आणि घाईमध्ये किंवा अनेक मतदारांनी मतदार माहिती चिठ्ठी आणली नसल्यामुळे देखील हा गोंधळ होत आहे.

हेही वाचा – राज्यात आज अंतिम टप्पा; मुंबई, ठाणे, नाशिकसह १३ मतदारसंघांत मतदान, २६४ उमेदवार रिंगणात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – समाजमाध्यमांची रणभूमी; प्रचाराची मुदत संपल्यानंतर ‘पोस्ट’, ‘रिल’मधून विखार

दरम्यान, सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, प्रथम मतदार सकाळपासूनच केंद्रावर जमल्याचे दिसते आहे. पहिल्यांदाच मतदान करण्याची उत्सुकता, उत्साह नवं मतदारांच्या चेहेऱ्यावर दिसत आहे.