नाशिक अंमलीपदार्थ कारखान्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी हरिश पंत याने आणखी दोन संशयीतांना कारखाना बनवण्यास मदत केल्याचा संशय त्याबाबात पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी न्यायालयाने ललित पाटीलला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. साकिनाका पोलीस लवकरच ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलचा ताबा याप्रकरणी घेणार आहेत. अंमलीपदार्थ निर्मितीतील प्रमुख आरोपी ललित पाटील प्रकरणात साकीनाका पोलिसांनी हरिश पंत नावाच्या आरोपीला अटक केली होती. हरिश पंतच्या मदतीने ललित पाटील व भूषण यांनी नाशिकमध्ये मेफेड्रोनचा(एमडी) कारखाना सुरू केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा >>> महापालिकेच्या अधिकाऱयांना मारहाण : भाजप आमदार तामिळ सेल्वन यांच्यासह पाचजणांना सहा महिन्यांचा कारावास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पंतने आणखी दोन संशयीतांना कारखाना बनवण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. हा कारखाना वसई-विरार परिसरात बनवण्यात आल्याचा संशय़ आहे. पण तपासणीत पोलिसांना काहीही सापडलेले नाही. याप्रकरणी आरोपी हरिश पंतनला सोमवारी न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.तर ललित पाटील व त्याचा चालक सचिन वाघ या दोघांनाही न्यायालयाने न्यायायीने कोठडी सुनावली. पुणे पोलीस ललितचा ताबा घेणार आहेत. दरम्यान ललितने आपल्याला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा पुनरुच्चार केला. याशिवाय पुणे पोलिसानी अटक केलेला आरोपी भूषण पाटीलचा ताबा लवकरच साकीनाका पोलीस घेणार आहेत. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असून एक-दोन दिवसांत भूषण पाटीलचा ताबा मिळण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत ३०० कोटींहून अधिक किंमतीचे मेफेड्रोन(एमडी) जप्त करण्यात आले आहे.