मुंबई : यंदाच्या हंगामातील केशर आंब्यांच्या पहिल्या पेटीची आज वाशी येथील बाजार समितीत विक्री होणार आहे. कोकणातून आलेली यंदाच्या हंगामातील ही पहिलीच आंब्याची पेटी असल्याची माहिती बाजार समितीतील फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

हेही वाचा…बांबू उत्पादक शेतकऱ्यांना येणार चांगले दिवस जाणून घ्या, एनटीपीसीच्या सोलापूरमधील प्रकल्पात बांबूचा वापर कसा होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय पानसरे म्हणाले, देवगड तालुक्यातील वाघोटण येथील आंबा उत्पादक शेतकरी शकील मुल्ला यांच्या बागेत तयार झालेली पाच डझनाची केशर आंब्याची पेटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील मे. एन. डी. पानसरे अॅन्ड संन्स या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यंदाच्या हंगामातील ही पहिली पेटी असल्यामुळे रीतसर पेटीची पूजा करून आंब्याच्या हंगामाचा मुहूर्त केला जाणार आहे. या नंतर कोकणातून हापूस आणि केशर आंब्याची आवक हळूहळू होत राहील. मात्र, आंब्याचा मुख्य हंगाम १५ मार्चनंतरच सुरू होईल.