जगातील पहिल्या २०० उच्च शिक्षणसंस्थांमध्ये समावेश

पुणे : जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘क्यूएस’ क्रमवारीमध्ये जगातील पहिल्या २०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील आयआयटी मुंबईने स्थान प्राप्त के ले आहे, तर सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाला ५९१ ते ६००, मुंबई विद्यापीठाला १००१ ते १२०० या गटात स्थान मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्वाकरेली सायमंड्स (क्यूएस) ही खासगी ब्रिटिश संस्था विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करते. विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या, संशोधन, गुणवत्ता, नोकरीच्या संधी अशा विविध निकषांच्या आधारे ही क्रमवारी जाहीर  करण्यात येते. त्यानुसार २०२२ साठीची क्रमवारी बुधवारी जाहीर करण्यात आली.

जगभरातील पहिल्या २०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये आयआयटी मुंबई १७७ व्या, आयआयटी दिल्ली १८५ व्या, बेंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स १८६ व्या स्थानी आहे. आयआयटी मद्रास २५५ व्या, आयआयटी कानपूर २७७ व्या, आयआयटी खरगपूर २८० व्या, आयआयटी गुवाहाटी ३९६ व्या, आयआयटी रुरकी ४०० व्या स्थानी आहे, तर पारंपरिक विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठ ५०१ ते ५१०, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ५६१ ते ५७०, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ ५९१ ते ६००, जादवपूर विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठ ६५१ ते ७०० या गटात आहेत.

 

क्रमवारीतील संस्था…

मुंबई विद्यापीठाला १००१ ते १२०० या गटात स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबई, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या तीनच संस्थांना क्रमवारीत स्थान मिळाले आहे.

पहिले तीन…

जागतिक क्रमवारीतील पहिल्या तीन क्रमांकांवर अनुक्रमे मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ आहेत. देशातील ३५ उच्च शिक्षण संस्थांनी या क्रमवारीत स्थान मिळवले आहे. त्यात प्रामुख्याने आयआयटीसारख्या केंद्रीय संस्थांचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे.

सर्वच आघाड्यांवर आयआयटी मुंबई प्रगती करत आहे. येत्या काळात आयआयटी मुंबईची कामगिरी अधिक चांगली होईल, याचा विश्वास वाटतो. – प्रा. सुभासीस चौधरी, संचालक,  आयआयटी मुंबई

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai iit in qs rankings indian institute of technology bombay akp
First published on: 10-06-2021 at 01:32 IST