मुंबई : कांदिवली येथील मिलिटरी मार्गावरील राम किसन मेस्त्री चाळीत २४ सप्टेंबर रोजी वायू गळतीमुळे लागलेल्या आगीत सातजण जखमी झाले होते. त्यापैकी तीन जखमींचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीन झाली आहे. रेखा जोशी (४७), नीतू गुप्ता (३१), पुनम (२८) अशी मृत महिलांची नावे आहेत.

नीतू गुप्ता आणि पुनम यांच्यावर ऐरोली बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. तर रेखा जोशी या कस्तुरबा रुग्णालयात दाखल होत्या. रविवारी रात्री ९ च्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित चार जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.