Mumbai Local Train Update: मुंबईच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रिय स्थिती, तसेच मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे पुढील आठवडाभर राज्यात पावसाला पोषक स्थिती असून अनेक भागांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे मुंबईसह ठाणे शहरात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच पावसाने पुन्हा चांगला जोर धरला आहे. अशावेळी मुंबई लोकलची स्थिती काय आहे याबाबत मध्य व पश्चिम रेल्वेकडून ट्वीटमार्फत माहिती देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मुख्य रेल्वेमार्ग म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ कर्जत/ खोपोली तसेच हार्बर मार्ग (CSMT ते पनवेल- वाशी) ट्रान्स हार्बर (ठाणे- वाशी/पनवेल) तसेच बेलापूर- नेरळ- खारकोपर लाईन या चारही मार्गांवर ट्रेन सुरळीत सुरु आहेत. तर पश्चिम रेल्वेने दिलेल्या अपडेटनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे (चर्चगेट- डहाणू) व पश्चिम हार्बर (माहीम- गोरेगाव) या दोन्ही लाईनवरील ट्रेन नियमित वेळेनुसार धावत आहेत. प्रवाशांच्या माहितीनुसार काही स्थानकांमध्ये ट्रेन १० ते १५ मिनिट उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वे ट्वीट

पश्चिम रेल्वे ट्वीट

हे ही वाचा<< ३ ऑगस्टपर्यंत ‘या’ ८ तारखांना राज्यात तुफान पावसाचे अंदाज; पडझडीचेही संकेत, पावसाचे स्वरूप बदलले कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ठाणे- पालघर भागात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. आज दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी समुद्रात भरती येणार आहे. यावेळी साधारण ४. १४ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर पाहता अनेक शाळेला- कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. आपणही अत्यंत महत्त्वाच्या कारणाशिवाय बाहेर पडणे टाळावे.