मुंबईतील जुहू परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहरू नगर येथील एका सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी ३५ वर्षीय देवेंद्र वड्डी याला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या धक्कादायक घटनेनंतर परिसरातील एकाच संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक लोकांनी जुहू पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आरोपीला ताब्यात देण्याची पोलिसांकडे मागणी केली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मागील दोन दिवसांपासून चिमुरडी बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असताना आज शनिवारी तिचा मृतदेह एका सार्वजनिक शौचालयात आढळला. तिच्यावर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय तपासणीनंतर उघड झालं. यानंतर परिसरातील संतप्त लोकांनी पोलिस स्टेशनबाहेर घेराव घातला.

चौकशी केली असता अटक करण्यात आलेल्या देवेंद्र वड्डी यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं. वड्डी हा जुहू परिसरात राहणारा असून त्याच्यावर याआधीही काही गुन्हे दाखल आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai locals protest outside juhu ps after body of a 9 year old girl was found in a drain in nehru nagar juhu
First published on: 06-04-2019 at 17:44 IST