Hate Speech Case Salman Azhari : गुजरात एटीएसने मुस्लीम धर्मगुरु तसंच इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरींना अटक केली आहे. त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात पोलिसांनी काही वेळापूर्वीच मुफ्ती सलमान अजहरींना अटक केली. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला आहे. हे सगळे मुफ्ती सलमान अजहरींचे समर्थक आहेत. त्यांची पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरु आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

काय घडली घटना?

मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसकडून आज दुपारी बाराच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सलमान अजहरींना अजूनही घाटकोपर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. यावेळी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घाटकोपर भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुफ्ती सलमान अजहरी यांचे समर्थक घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर रास्ता रोको करून घोषणाबाजी सुरु केली. त्यांच्या समर्थकांनी अफाट अशी गर्दी केली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरचा दबावही वाढला आहे.

salman khan firing case marathi news,
सलमान खान गोळीबार प्रकरण: पंजाबमधून अटक आरोपींना घेऊन पथक मुंबईत दाखल, आज न्यायालयापुढे हजर करणार
Clashes Erupt, Between Groups, During Shri Ram Navami Procession, Nagpur Police Lathi Charge, Control Situation, ram navami nagpur clashes, nagpur ram navami, crime story nagpur, clashes ram navami, ram navami clashes,
नागपुरात आक्रित…रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांवर दगडफेक! पोलिसांकडून लाठीचार्ज…
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार

मुफ्ती सलमान अजहरींचे वकील वाहिद शेख काय म्हणाले?

आज ३५ ते ४० पोलीस साध्या वेशात मुफ्ती सलमान अजहरींच्या घरी आले होते. आम्ही तिकडे पोहचलो, त्यांना विनंती केली की काय झालंय ते सांगा? मात्र ते म्हणाले तुम्ही सलमान अजहरींना बोलवा. त्यानंतर सलमान अजहरींनी घराचा दरवाजा उघडला. या सगळ्यांना घरात घेतलं. त्यानंतर कलम १५३ ब च्या अन्वये गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं. त्यावर मुफ्ती सलमान अजहरी म्हणाले की मला तुम्ही पोलीस ठाण्यात घेऊन चला, मला नोटीस द्या मी तुम्हाला सहकार्य करतो. मात्र अजूनही मुफ्ती सलमान अजहरी यांना सोडण्यात आलेलं नाही. लोकांनी विरोध केला, शांततेच्या मार्गाने आंदोलनही केलं पण उपयोग झाला नाही असं वाहिद शेख यांनी ANI ला सांगितलं.

घोषणाबाजी करू नका आणि कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन घाटकोपर पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र मुफ्ती सलमान अजहरी यांचे समर्थक अजूनही येथे जमले आहेत. गुजरात एटीएसला मुफ्तींना गुजरातला न्यायचे आहे. मात्र लोकांची गर्दी पाहता त्यांना अजूनही पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आलं आहे.

हे पण वाचा- मुंबईतून अटक झालेले इस्लामी धर्मगुरु सलमान अजहरी कोण आहेत?

मुफ्ती सलमान अजहरी यांनी गुजरातमधल्या जुनागड येथे ३१ जानेवारी रोजी प्रक्षोभक भाषण केलं असा त्यांच्यावर आरोप आहे. या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या व्हिडीओची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी मलिक आणि हबीब या आयोजकांना अटक केली आहे. तर आता मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणाहून अजहर यांना अटक करण्यात आली आहे.