मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांपैकी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) एकूण ६१ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३१ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

एकूण २२७ प्रभागांपैकी अनुसूचित जातीसाठी (महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरुन) १५ प्रभाग व अनुसूचित जमातीसाठी (महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) २ असे एकूण १७ आरक्षित प्रभाग वगळून उर्वरित २१० प्रभागांमधून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता एकूण ६१ प्रभागांसाठी आरक्षण काढण्यात आले.

ओबीसीसाठी ६१ आरक्षित जागा पुढीलप्रमाणे

१, ४, ६, १०, ११,१२, १३, १८, १९, २७,३२, ३३,४१, ४५,४६, ४९, ५०, ५२, ६३,६९,७०, ७२,७६,८०, ८२, ८५,८७, ९१, ९५, १००, १०५, १०८, १११, ११३, ११७,१२८, १२९, १३०,१३५, १३६,१३७, १३८, १५०, १५३, १५८,१६७, १७०, १७१, १७६, १८२, १८७,१९१, १९३, १९५, १९८, २०८, २१६, २१९, २२२,२२३, २२६

ओबीसी महिलांसाठी आरक्षित ३१ जागा

१, ६, ११, १२, १३, १८, १९, २७, ३२, ३३, ४६, ४९, ५२, ७२, ८०, ८२, १००, १०५, १०८, ११७, १२८, १२९, १५०, १५३, १५८, १६७, १७०, १७६, १९१, १९८, २१६,

ओबीसी पुरुषांसाठी ३० जागा

४, १०, ४१, ४५, ५०, ६३, ७०, ७६, ७९, ८५, ८७, ९१, ९५, १११, ११३, १३०, १३५, १३६, १३७, १३८, १७१, १८२, १८७, १९३, १९५, २०८, २१९, २२२, २२३, २२६

शेवटची चिठ्ठी प्रभाग क्रमांक १०० ची

ओबीसीच्या आरक्षणासाठी चिठ्ठ्या काढताना शेवटची चिट्ठी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी व्यासपीठावरून दाखवली. तो प्रभाग क्रमांक १०० होता. ही चिट्ठी काढल्यानंतर एकच गलका झाला. ओबीसी आरक्षणातून आपला प्रभाग सुटल्याबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा प्रत्येक सोडतीनतर दिल्या जात होत्या. काही वेळा कार्यकर्ते खुश होत होते, काही वेळा सुस्कारे टाकून निराशा व्यक्त करीत होते.