मुंबईतल्या बड्या बांधकाम व्यवसायिकाकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाचा भाऊ अकील लकडावालाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेनंतर अकीलला न्यायालयासमोर हजर केले असता 8 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिसेंबर 2018 पासून एजाज लकडावालाने परदेशातून पुन्हा एकदा मुंबईतल्या बांधकाम व्यवसायिकांकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली होती. फिर्यादी बांधकाम व्यवसायिकाला इंटरनॅशनल कॉलद्वारे खंडणीचे फोन यायला लागले. बांधकाम व्यवसायिकाने हे फोन घेणं बंद केल्यानंतर त्याला लँडलाईनवरुन धमकीचे फोन यायला लागले. यानंतर फिर्यादीने मुंबईच्या गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी केलेल्या तपासात बांधकाम व्यवसायिकाला येणाऱ्या धमकीच्या फोनमागे त्याचा भाऊ अकील लकडावाला उर्फ मर्चंटचा सहभाग असल्याचं समोर आलं. यानंतर सापळा रचून पोलिसांनी अकीलला अटक केली आहे. या प्रकरणातला पुढील तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police arrested gangster aijaj lakdawala brother akil on extortion charges
First published on: 01-03-2019 at 21:36 IST