‘बिग बॉस’ कार्यक्रमामुळे प्रकाश झोतात आलेल्या उर्फी जावेदला बलात्कार व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नवीन रंजन गिरी याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. नवीन गिरीवर विनयभंगासह अश्लील संभाषण करणे, धमकी देणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

हेही वाचा >>> नवनीत राणांना कोर्टाचा दणका, अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती देण्यासही नकार; अडचणी वाढण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या १५ दिवसांमध्ये नवीन गिरीने अनेक वेळा उर्फी जावेदला दूरध्वनी, व्हाट्सॲपवर संदेश पाठवून बलात्कार करण्याची, तसेच ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यात अश्लील भाषेत वापर करण्यात आला होता. याबाबतची माहिती उर्फीने गोरेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर एका महिला उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून शुक्रवारी पोलिसांनी नवीन गिरीविरुद्ध विनयभंगासह अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे आदी भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. उर्फीने सोशल अकाऊंटवर धमकी येत असल्याची तक्रार केली होती. या घटनेची पोलिसांनी स्वत:हून दखल घेत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मंगळवारी नवीन गिरीला अटक केली. तपासात भाड्याच्या खोलीच्या पैशांवरून त्यांच्यात वाद झाला होता. याच वादातून त्याने तिचा विनयभंग, अश्लील संभाषण करून बलात्काराची धमकी दिली होती. अटकेनंतर त्याला बुधवारी बोरिवलीतील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.