मुंबईः मोबाइल चोरांना विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा करणारे पोलीस शिपाई विशाल पवार यांचा मृत्यू बहुधा विविध अवयव निकामी झाल्यामुळे झाला होता. याप्रकरणी पवारचे नातेवाईक व जवळच्या मित्रांचा जबाब नोंदवण्यात आला असून दारूचे व्यसन असलेले पवार वैयक्तीक अडचणींमुळे नैराश्याने ग्रासले होते, अशी माहिती संबंधितांचे जबाब घेतल्यानंतर रेल्वे पोलीस दलातील सूत्रांनी दिली.

पवार यांना मुल-बाळ नव्हते. पवार यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे आपण एकट्या मुलाला वाढवू शकणार नाही असे सांगून पत्नीने गर्भपात केला होता. या प्रसंगामुळे पवार दाम्पत्याला मानसिक धक्का बसला होता. नाशिकला एका विवाह सोहळ्यासाठी पवार कुटुंबिय गेले असताना या विषयावर कुटुंबामध्ये चर्चाही झाली होती, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यानंतर दोन दिवसानी म्हणजे २७ मे रोजी विशाल पवार नाशिकहून ठाण्यात आला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी लोकल पकडली.

हेही वाचा : मुंबईतील चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयातील हिजाब बंदीविरोधात विद्यार्थिनींची उच्च न्यायालयात धाव

पवार यांना दारूचे व्यसन असल्याचे पोलीस चौकशीत आढळून आले आहे. पोलिसांनी गेल्या वर्षभरातील त्यांच्या बँक व्यवहाराचे तपशीलही मिळवले आहेत, त्यात वाईन शॉप्स आणि बारमध्ये मोठ्या प्रमाणात मद्याची खरेदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. मद्याचे अतिसेवन केल्याने पवार यांना त्यांच्या गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबई पोलिसांच्या सशस्त्र पोलीस विभाग-३ मध्ये ते कार्यरत होते. त्यांना २९ एप्रिल रोजी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. ठाण्याहून २७ एप्रिल रोजी भायखळा येथे लोकलने जात असताना माटुंगा – शीव स्थानकांदरम्यान चोरांनी हातावर फटका मारून मोबाइल चोरला. त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी विषारी इंजेक्शन टोचले. त्यामुळे आपण बेशुद्ध होऊन खाली कोसळलो, असे विशाल पवार यांनी जबाबात सांगितल होते. शुद्धीवर आल्यानंतर घर गाठले. त्यानंतर प्रकृती खालावली. त्यामुळे आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी जबाबात सांगितले होते. त्यानंतर १ मे रोजी उपचारादरम्यान पवार यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : मतमोजणी केंद्रात मोबाइल नेल्याप्रकरणी उमेदवाराच्या प्रतिनिधीसह दोघांविरोधात गुन्हा, एक आरोपी नवनिर्वाचित खासदाराचा नातेवाईक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पवार सांगितलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी २७ एप्रिल रोजी दादर पूर्व येथील बारमध्य मध्य प्राशन केले होते. त्यानंतर ते रात्रभर परळ रेल्वे स्थानकावर झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पवार यांनी माटुंग्याला अंगठी विकली व त्या पैशांची दारू प्यायले. त्यानंतर ठाण्याला जाऊन पुन्हा नातेवाईकासोबत मद्यप्राशन केले होते. घरी गेल्यानंतर पवार यांची प्रकृती खालवली. रात्रभर उलट्या झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्रभर, त्याला अनेक वेळा उलट्या झाल्या आणि दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी वैद्यकीय अहवालात पवार यांच्या शरिरात कोणताही विषारी पदार्थ नसल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी रेल्वे पोलीस लवकरच बी समरी अहवाल प्राप्त करणार आहेत.