मुंबई : विस्तारा एअरलाईनसह आणखी तीन विमान कंपनीच्या एक्स (ट्वीटर) हॅन्डलवर विमानात बॉम्ब ठेवल्याचा संदेश पाठवणाऱ्याविरोधात सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विमानात बॉम्बच्या धमकीचे मुंबईत आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत.

धमकीचा संदेश हा संदेश २००८ब्लूमिंग या एक्स खात्यावरून आला आहे. याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीचे संदेश येण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १२ दिवसांत मुंबई पोलिसांनी १२ गुन्हे दाखल केले असून त्यात विमानात बॉम्ब असल्याचे संदेश अथवा ई-मेल करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> एकाच फेरीत आठही नव्या महाविद्यालयांतील जागा भरल्या, तिसऱ्या फेरीनंतर १७ जागा रिक्त

याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे. गेल्या आठवड्याभरापासून धमक्यांचे सत्र सुरू असून सर्व विमानांमधील प्रवाशांची आणि सामानाची बारकाईने तपासणी करण्यात आली, परंतु त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. आवश्यक तपासणीनंतर, धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा >>> वांद्रे टर्मिनस चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी ६० हून अधिक विमानांना धमक्या भारतीय वाहकांच्या ६० हून अधिक विमानांना सोमवारी बॉम्बच्या धमक्या मिळाल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.१५ दिवसांत ४१० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना फसव्या बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुतांश धमक्या देण्यात आल्या होत्या. सोमवारी एअर इंडिया आणि इंडिगोच्या प्रत्येकी २१ विमाने आणि विस्ताराच्या सुमारे २० विमानांना धमक्या मिळाल्या. याप्रकरणी रविवारी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू म्हणाले की, बॉम्बच्या धमक्या देणाऱ्या गुन्हेगारांना उड्डाण करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी केंद्र पावले उचलत आहे.