Prabhadevi Bridge Close Traffic Route Changes: प्रभादेवी येथील १२५ वर्षांहून अधिक जूना पूल शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. तर पूल बंद केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) पुलाचे पाडकाम करत त्याजागी द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे. पाडकाम आणि नवीन द्विस्तरीय पुलाचे काम पूर्ण करत नवीन द्विस्तरीय पूल वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी किमान २० महिन्यांचा कालवाधी अपेक्षित आहे. त्यामुळे प्रभादेवी पूल बंद करताना या पुलावरुन जाणारी वाहतूक इतरत्र वळविण्यात आली असून वाहतूकीत अनेक बदल करण्यात आले आहेत.

वाहतुकीतील बदल असे

पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्या वाहनांकरीता

-दादर पूर्वकडून दादर पश्चिमेकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागेल.

-परळ पूर्वकडून प्रभादेवी आणि लोअर परळला जाणाऱ्या वाहन चालकांना करी रोड पुलाचा वापर सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत करावा लागेल.

-परळ, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतू्च्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागेल.

पश्चिमेकडून पुर्वेकडे जाणाऱ्या वाहनांकरीता

-दादर पश्चिमेकडून दादर पुर्वकडे जाणाऱ्या वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागणार आहे.

-प्रभादेवी आणि लोअर परळ पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहन चालकांना करी रोड पुलाचा वापर दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत करावा लागणार आहे.

-सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतू तसेच प्रभादेवी, वरळीकडून परळ, भायखळा पूर्वकडे जाणाऱ्या वाहन चालकांना चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागणार आहे.

महादेव पालव मार्गच्या वाहतूक नियोजनातील बदल असे-

महादेव पालव मार्गावरील काॅ. कृष्णा देसाई चौकाकडून शिंगटे मास्तर चौककडील वाहतूक सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत एका दिशेने सुरु राहिल.

महादेव पालव मार्गावरील शिंगटे मास्तर चौककडून काॅ कृष्णा देसाई चौककडील वाहतूक दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत एका दिशेने सुरु राहिल.
महादेव पालव मार्गावरील दोन्ही मार्गिका रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी खुल्या राहतील.

नो पार्किंग मार्ग असे –

ना.म.जोशी मार्ग-काॅ. गुलाबराव गणाचार्य चौक ते धनमिल नाकापर्यंत दोन्ही वाहिनी

सेनापती बापट मार्ग-संत रोहिदास चौक ते रखांगी जंक्शनपर्यंत दोन्ही वाहिनी

महादेव पालव मार्ग -काॅ कृष्णा देसाई चौक ते शिंगटे मास्तर चौकपर्यंत दोन्ही वाहिनी

साने गुरुजी मार्ग- संत जगनाडे चौक ते काॅ. गुलाबराव गणाचार्य चौकपर्यंत दोन्ही वाहिनी

भवानी शंकर मार्ग-हनुमान मंदिर, कबुतरखाना ते गोपीनाथ गणाचार्य चौकपर्यंत दोन्ही वाहिनी

रावबहाद्दूर मार्ग-हनुमान मंदिर ते पोर्तुगिज चर्चेपर्यंत दोन्ही वाहिनी

संपूर्ण डाॅ बाबासाहेब आंबेडकर मार्ग दोन्ही वाहिनी

वाहतुकीस दुहेरी मार्ग चालू

सेनापती बापट मार्ग-वडावा नाका ते फितवाला जंक्शनपर्यंत दुहेरी मार्ग चालू राहील.