मंकी हिल, कर्जत घाटक्षेत्रात दुरुस्तीची कामे, १६पासून ‘प्रगती’ही रद्द

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : कर्जत आणि मंकी हिल या घाट क्षेत्रात रुळांच्या दुरस्तीचे काम मध्य रेल्वे हाती घेणार आहे. १५ ऑक्टोबरपासून दहा दिवस सुरू राहणाऱ्या कामांमुळे मुंबई ते पुणे, पंढरपूर, भुसावळ, नांदेडसह अन्य गाडय़ांचे वेळापत्रक बिघडणार आहे.

१६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबपर्यंत पुणे ते मुंबई ते पुणे प्रगती एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. याआधीही याच घाट क्षेत्रात कामे घेण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा आरक्षण करुन प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतुक पुर्ववत करण्यासाठी घाट क्षेत्रातील कामे दहा दिवसांच्या आत संपवण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती मुख्य जनसपंर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

दरम्यान, ११०२५ व ११०२५ भुसावळ ते पुणे – भुसावळ १५ ते २० ऑक्टोबपर्यंत दौंड-मनमाडमार्गे धावेल.

रद्द केलेल्या रेल्वे गाडय़ा:

’५१०२७ सीएसएमटी ते पंढरपूर सुरपफास्ट पॅसेंजर (१७, १८ आणि १९ ऑक्टोबर)

’५१०२८ पंढरपूर ते सीएसएमटी सुरपफास्ट पॅसेंजर (१८, १९ आणि २० ऑक्टोबर)

’५१०२९ मुंबई ते बिजापूर फास्ट पॅसेंजर (१५, १६ आणि २० ऑक्टोबर)

’५१०३० बिजापूर ते मुंबई फास्ट पॅसेंजर (१६, १७ आणि २१ ऑक्टोबर)

’०७६१७ नांदेड ते पनवेल (१९ ऑक्टोबर)

’०७८१८ पनवेल ते नांदेड (२० ऑक्टोबर)

’१२१२६ व १२१२५ पुणे ते सीएसएमटी ते पुणे प्रगती एक्स्प्रेस (१६ ते २० ऑक्टोबर)

पुण्यापर्यंत धावतील- पुण्यातून सुटतील:

’१५ ते २० ऑक्टोबर : ११०२९ आणि ११०३० सीएसएमटी ते कोल्हापूर ते सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस

’१५ ते २० ऑक्टोबर : १७३१७ व १७३१८ हुबळी ते एलटीटी ते हुबळी

’१६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर : १२७०१ व १२७०२ हैद्राबाद ते मुंबई ते हैद्राबाद हुस्सेननगर एक्स्प्रेस

’१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर :  १८५१९ आणि १८५२० विशाखापट्टणम ते एलटीटी ते विशाखापट्टणम

’१६ ते १८ ऑक्टोबर, २० ऑक्टोबर :  १७६१४ नांदेड ते पनवेल पुण्यापर्यंतच

’१७ ते १९ ऑक्टोबर, २१ ऑक्टोबर :   १७६१३ पनवेल ते नांदेड पुण्यातून सुटेल

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune railway schedule will be disturbed from today zws
First published on: 15-10-2019 at 02:59 IST