मध्य रेल्वे
- कधी- रविवार, ७ मे २०१७
- कुठे- माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर
- केव्हा- सकाळी सव्वा दहा ते दुपारी सव्वा तीन
- परिणाम- छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन जलद आणि अर्धजलद उपनगरी गाडय़ा माटुंगा येथून डाऊन धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील. मुलुंडपासून या गाडय़ा पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे
- कधी- रविवार, ७ मे २०१७
- कुठे- सांताक्रूझ ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर
- केव्हा- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
- परिणाम- या कालावधीत सांताक्रूझ ते माहिमदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावरील वाहतूक अप व डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे
- कधी- रविवार, ७ मे २०१७
- कुठे- छत्रपती शिवाजी टर्मिनस-चुनाभट्टी व वांद्रे डाऊन तसेच चुनाभट्टी, वांद्रे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अप मार्गावर
- केव्हा- सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० आणि सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
- परिणाम- छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पनवेल येथे जाणारी डाऊन वाहतूक (सकाळी ११.२१ ते दुपारी ४.३९) तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून वांद्रे, अंधेरी येथे जाणाऱ्या सर्व गाडय़ांची डाऊन वाहतूक (सकाळी १०.३८ ते ४.४३) पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पनवेल येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे (सकाळी ९.५२ ते दुपारी ३.२६) आणि वांद्रे, अंधेरी येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने होणारी उपनगरी गाडय़ांची वाहतूकही (सकाळी १०.४४ ते दुपारी ४.१३) बंद ठेवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
