मुंबई : मुंबईत रविवारी २५ मे रोजी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहर भागाला झोडपून काढले. दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईत जास्त पाऊस पडला. तर नरिमन पॉईंट परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. नरिमन पॉईंट परिसरात १० – १२ तासांत अडीचशे मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे-

नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र – २५२ मिमी

चर्चगेट परिसर – २१६ मिमी

महानगरपालिका मुख्यालय – २१४ मिमी

कुलाबा उदंचन केंद्र – २०७ मिमी

दोन टाकी – २०२

चंदनवाडी, मरीन लाईन्स – १८०

मेमनवाडा अग्निशमन केंद्र – १८३

ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी – १७१

नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ – १०३

सुपारी टँक, वांद्रे – १०१

जिल्हाधिकारी वसाहत, चेंबूर – ८२

एल विभाग कार्यालय, कुर्ला – ७६

दक्षिण मुंबईत सर्वाधिक पाऊस पडल्यामुळे या पावसात सीएसएमटी स्थानक परिसर, चर्चगेट येथील के. सी. कॉलेज परिसर, मंत्रालयचा परिसर या भागात कधी नव्हे ते पाणी साचले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केम्स कॉर्नरजवळ रस्ता खचला, बस जागीच उभी

दक्षिण मुंबईतील केम्स कॉर्नर परिसरात सकाळच्या वेळी रस्ता खचला. मलबार हिलजवळील केम्स कॉर्नर परिसरात ही घटना घडली. रस्ता खचल्यामुळे वाहतूक पोलिसांनी रस्ता रोधक (बॅरिकेडस) उभारून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. परिणामी, येथे एक बस बरचा वेळ जागच्या जागीच उभी होती. केम्स कॉर्नर ते मुकेश चौकादरम्यान रस्ता खचल्यामुळे बेस्टने बसमार्ग वळवले आहेत. अप दिशेतील बस मार्ग क्रमांक १०४, १२१, १२२, १३२, १३५ पेडर रोड, कॅडबरी जंक्शन ,भुलाबाई देसाई मार्गाने जे. मेहता कडे जात आहेत. दरम्यान, मलबारच्याजवळील पाटकर मार्गावरील टेकडी उताराचा भागही २०२० च्या पावसाळ्यात खचला होता. टेकडीवरून जाणारा बी. जी. खेर मार्ग पूर्ववत करण्यासाठी बराच कालावधी लागला होता.