विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास सात झोपड्या जवळच्या नाल्यात खचल्या. दुमजली स्वरुपाचे कच्चे बांधकाम असलेल्या या झोपड्या खचल्या असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या दुर्घटनेनंतर आसपासच्या २४ झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या असून रहिवाशांना पालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदीची मागणी; तीन जैन ट्रस्टची जनहित याचिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विलेपार्ले पश्चिमेकडे जुहू रोड परिसरात मिठीबाई महाविद्यालयाच्याजवळ ३० ते ४० दुमजली झोपड्या आहेत. या झोपड्यांपैकी सात झोपड्या रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक मोठ्या नाल्यामध्ये खचल्या. या दुर्घटनेनंतर जवळच्या २४ झोपड्या तात्काळ रिकाम्या करण्यात आल्या. झोपड्यांमधील रहिवाशांना पालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे अद्याप वृत्त नाही.