मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) आणि पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाच्या (एलएलएम) प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार २६ ऑक्टोबरपासून या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या दोन्ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षा १० नोव्हेंबर रोजी विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. तर ‘पेट’ नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेतली जाणार असून परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षेसाठी https://uomllmcet.formsubmit.in/ या संकेतस्थळावरून ३ नोव्हेंबरपर्यंत आणि ‘पेट’साठी https://uompet2024.formsubmit.in/ या संकेतस्थळावरून ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

हेही वाचा – मुंबई : मानखुर्द टी जंक्शनवर उड्डाणपूल बांधणार, वाहतूक कोंडी टळणार

हेही वाचा – बोरिवलीमध्ये बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांसाठीचे प्रवेश अर्ज, पात्रता, नोंदणी, शुल्क आणि नियम अनुषंगिक तपशीलवार माहिती मुंबई विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित होणाऱ्या ऑनलाईन ‘पेट’ परीक्षेसाठी ७६ विषय असून मागील ‘पेट’ परीक्षेत सर्वसाधारण ६ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तर ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षेसाठी साधारणत ५ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सातही जिल्ह्यांत या परीक्षेचे आयोजन केले जाणार असून ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षेसाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.