मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून दिवाळीनंतरच या परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने सांगितले आहे.विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा १० ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. मात्र, हे सत्र उशीरा सुरू झाल्यामुळे पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्याचबरोबर परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली.

हेही वाचा >>> उपसचिवाच्या हस्तक्षेपामुळे म्हाडातील बदल्या शासनाकडेच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांच्या नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा , मानव्य विद्याशाखा , विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा व आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा अधिक परीक्षा होणार आहेत.