Sunday Mega Block Updates : पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी मेगाब्लाॅक घेण्यात येतो. मेगाब्लाॅक काळात अभियांत्रिकी आणि पायाभूत कामे करण्यात येतात. परंतु, रविवारी सुट्टीच्या दिवशी मेगाब्लाॅकमुळे घेतल्याने, प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

त्यामुळे पश्चिम रेल्वेने रविवारचा मेगाब्लाॅक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर – बोरिवली स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रात्री ३ पर्यंत ३.३० तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. तर, भाईंदर – बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ३.३० तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत विरार / वसई रोड आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, ब्लाॅक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नाही. त्यामुळे प्रवाशांना रविवारी विनाव्यत्यय प्रवास करणे शक्य होईल.