Kurla Murder Latest News : आपला तिरस्कर करीत असल्याच्या रागातून वृद्ध आईची ४१ वर्षीय मुलीने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी मुलीविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली.

हेही वाचा – मराठी बोलण्यास सांगितल्याने तरुणाला कान पकडून माफी मागण्यास पाडले भाग

हेही वाचा – मुंब्रा मराठी माणसाची कान पकडून माफी प्रकरण, अविनाश जाधव म्हणाले आता भोगा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंब्रा परिसरात वास्तव्यास असलेल्या सबीरा बानो (६२) गुरुवारी कुर्ला येथील कुरेशी नगरमध्ये राहणारी मुलगी रेश्मा काझीकडे (४१) आल्या होत्या. मात्र आपल्यापेक्षा आई मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते, तिला मदत करते असा रेश्माचा समज होता. याच करणावरून दोघींमध्ये गुरुवारी सायंकाळी वाद झाला. यावेळी संतापलेल्या रेश्माने आईवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. त्यानंतर ती स्वतः चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल झाली. रेश्माने आईची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुक्रवारी सकाळी तिला अटक केली.