मुंबईः अंधेरीमध्ये तरूणाची हत्या | Mumbai Youth killed in Andheri mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई : अंधेरीमध्ये तरूणाची हत्या

अंधेरी पश्चिम येथील सात बंगला परिसरात डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून ३० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.

मुंबई : अंधेरीमध्ये तरूणाची हत्या
( संग्रहित छायचित्र )

अंधेरी पश्चिम येथील सात बंगला परिसरात डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून ३० वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

वर्सोवा सात बंगला बस आगाराजवळ एक तरूण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांना रविवारी मिळाली होती. माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरूणाला तातडीने कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे नाव सूरज असून तो २५ ते ३० वयोगटातील आहे. त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सुरूवातीला अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण वैद्यकीय तपासणीतील माहिती व प्राथमिक तपासाच्या आधावर याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली आहे. तसेच परिसरातील सीसी टीव्हीच्या मदतीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-07-2022 at 11:32 IST
Next Story
उद्धव ठाकरेंच्या ‘वडील चोरायला निघाले’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “त्यांच्या आशीर्वादामुळेच हे…”