लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः गोवंडी येथे निष्कासन कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला महिलेने मारहाण केली. याप्रकरणी महानगरपालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली.

मुंबई महानगरपालिकेच्या एम-पूर्व विभाग कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी कृष्णा म्हापणकर (४९) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चेंबूरच्या वाशी नाका परिसरातील सदनिकांचे निष्कासन करण्यासाठी सहकारी आणि तक्रारदाराबरोबर जात होते. त्यावेळी महिला फातिमा शकील शेख (३६) हिने त्यांना अडवले. तसेच तेथे उपस्थित आरोपी महिला रुबिना शेखने (२३) मोबाइलमधील काही कागदपत्रे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा… “भाजपाने काही पोपट पाळून ठेवले आहेत, त्यांना…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी म्हापणकर यांनी तिला याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याची सूचना केली. त्यावेळी आरोपी रुबिनाने म्हापणकर यांच्या कानाखाली मारली. याप्रकरणी म्हापणकर यांच्या तक्रारीवरून देवनार पोलिसांनी भादंवि कलम ३५३ व ३३२ अंतर्गत सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच देवनार पोलिसांच्या निर्भया पथकाने घटनास्थळी जाऊन आरोपी कुसूम ऊर्फ रुबिना शेखला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणून तिला अटक करण्यात आली.