मुंबईः अभिनेता सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या नर्स एलियामा फिलिप ऊर्फ लिमा आणि आया जुनू यांनी हल्लेखोराला ओळख परेडमध्ये ओळखले आहे. मुंबईतील आर्थररोड कारागृहात बुधवारी ही ओळख परेड करण्यात आली. वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरी १६ जानेवारीला झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या फिलीप यांनी बुधवार आर्थर रोड कारागृहात पार पडलेल्या ओळख परेडदरम्यान अटक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम फकीर याला ओळखले.

पाच पंच व तहसिलदार यांच्या उपस्थितीत लिमा आणि जुनू यांनी आरोपीला ओळखल्याची माहिती सूत्रांनी दिली. हल्ल्याच्या दिवशी फिलीप यांनी सर्वप्रथम आरोपी शरिफुलला पाहिले होते. हल्लेखोराच्या हातात चाकू आणि काठी होती, आणि फिलीप यांच्याकडे एक कोटी रुपये’ देण्याची मागणी केली. त्यानंतर फिलीप आणि सैफचा मुलगा जहांगिरची आया उठली. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. सैफ व त्याची पत्नी करीना कपूर त्यांच्या खोलीतून बाहेर आले. मुलाच्या खोलीत अनोळखी व्यक्तीला पाहून सैफ त्याच्या जवळ गेला. त्यावेळी हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले. मात्र, नंतर खान कुटुंबियांनी कसेतरी हल्लेखोराला जहांगीरच्या खोलीत ढकलून १२व्या मजल्यावर पळ काढला. मात्र, दरवाजा नीट बंद करता आला नाही आणि त्यामुळे हल्लेखोराने तेथून पळ काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन दिवसांनंतर मुंबई पोलिसांनी ठाण्यातील लेबर कॅम्पमधून परिसरातून आरोपीला अटक केली. फिलीप आणि कर्मचारी या प्रमुख प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांमुळे त्यांनी आरोपीची ओळख परेड याप्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकेल. यापूर्वी सीसीटीव्हीतील आरोपी व अटक करण्यात आलेला शरिफुल यांच्या छायाचित्राची पडताळणी करण्यात आली होती. त्यात सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती शरिफुल असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय सीसीटीव्ही चित्रीकरण, मोबाईल लोकेशन असे तांत्रिक पुराव्यावरून शरिफुलच सैफवर हल्ला करणारा व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याला आर्थररोड कारागृहात ठेवण्यात आले आहेत.