राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. अटकेनंतर नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास मलिक यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

अटकेच्या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी, “मला अटक झालीय, पण मी घाबरणार नाही. मी लढणार आणि जिंकणार,” अशी प्रतिक्रिया दिलीय.

नक्की वाचा >> नवाब मलिक ईडी चौकशी : २०२४ चा इशारा देणाऱ्या राऊतांना नितेश राणेंचा टोला; म्हणाले, “यापुढे तुम्ही आपली…”

अटक केल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर गाडीमध्ये बसताना नवाब मलिक यांना पहिली प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी, “लड़ेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोस करेंगे,” असं म्हटलं.

तर अटकेनंतर नवाब मलिक यांच्या अधिकृत कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन ‘झुकुंगा नाही’ असं अटकेच्या कारवाईनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर येतानाचा फोटो ट्विट करत म्हटलंय. या फोटोमध्ये नवाब मलिक ईडीच्या कारयालयाबाहेर पडताना हाताची मूठ आवळून हात उंचावताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणासंदर्भात नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.