लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती शनिवारी दुपारी अचानक बिघडल्याने त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मलिक यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या ते वैद्यकीय कारणामुळे जामिनावर आहेत.

मागील काही महिन्यांपासून नवाब मलिक हे प्रकृतीच्या कारणाने जामीनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृती ठीक नसल्यामुळे ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये फारसे दिसत नव्हते. शनिवारी दुपारी अचानक त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयाच्या आपतकालिनक कक्षामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांची एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक यांनी दिली.

आणखी वाचा-म्हाडा भूखंडावरील न्यायाधीशांचे घर प्रति चौरस फूट साडेनऊ हजार रुपये!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाब मलिक यांना ईडीने २०२२ मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नवाब मलिक यांना मूत्रपींड आणि इतरही शारीरिक त्रास आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचारांची नितांत गरज असल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता.