मुंबई : भाजप एका वेगळय़ा विचारांनी वाटचाल करणारा आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला पक्ष असून आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्रे गेलेली आहेत. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण वरच्या स्थानावर कितीही शक्तिशाली व्यक्ती असली तरी सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपच्या दडपशाहीच्या राजकारणावर टीकास्त्र सोडले.

परभणीतील माजी आमदार व भाजपचे नेते विजय गव्हाणे, वर्धा येथील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुणे येथील आरपीआयचे नेते प्रदीप साठे, श्रद्धा साठे, नांदेड येथील बाळासाहेब जाधव, डॉ. सोनकांबळे, पैठणमधील किशोर दसपुते आदींसह कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Rohini Khadse Raksha Khadse
रोहिणी खडसे भाजपात जाणार?, रक्षा खडसेंच्या आवाहनावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या…
Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”

आज लोक हळूहळू भाजपबाबत फेरविचार करू लागले आहेत. १५ दिवसांपूर्वी भाजपचे नेते सांगत होते की, उत्तर प्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही. पण आज रोज कोणी तरी भाजप सोडून जात आहे. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे, याकडेही शरद पवार यांनी लक्ष वेधले.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नव्या पिढीला, सर्व समाजघटकातील लोकांना सोबत घेऊन एक प्रभावी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न होईल. या कामात विजय गव्हाणे यांची साथ मिळेल. चुकीच्या विचारांकडे जे लोक गेले आहेत. त्यांचे मनपरिवर्तन करून विजय गव्हाणे हळूहळू त्यांना राष्ट्रवादीत आणतील. परभणी जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ नेते आज उपस्थित आहेत. यांच्या सर्वाच्या सामूहिक प्रयत्नाने परभणी जिल्हा प्रागतिक विचारांचा जिल्हा राज्याला दिसेल, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

आज भाजपमध्ये अनेकांची कुचंबणा होत आहे. म्हणून अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊ इच्छितात. विजय गव्हाणे यांच्या माध्यमातून मराठवाडय़ातील अनेक पदाधिकारी पक्षात येतील असा ठाम विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.