राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष दीपक कोरडे यांनी इनोऐवजी नजरचुकीने कीटकनाशक पावडर घेतल्यामुळे त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. सोमवारी सकाळी दीपक कोरडे यांना आम्लपित्ताचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी इनोऐवजी नजरचुकीने कीटकनाशक पावडर घेतली. त्यामुळे त्यांना जास्त त्रास होऊ लागला. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रात्री त्यांचा मृत्यू झाला.