वाशीमध्ये ३ व ४ जूनला ‘मार्ग यशाचा’; समुपदेशक व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन भारतात ६४ कलांचा उगम आहे, असे म्हणतात. सुदैवाने २१व्या शतकातही हे कलागुण अवगत असलेल्यांना मरण नाही. किंबहुना या कलागुणांच्या माध्यमातून करिअरचे वेगवेगळे मार्गही धुंडाळता येतात. विद्यार्थ्यांची आपल्या अंगभूत कलांच्या मदतीने करिअर निवडीची वाट सुकर करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ठाणे व मुंबईतील यशानंतर नवी मुंबईत ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात येत्या ३ व ४ जून रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, समुपदेशक विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचसोबत कार्यक्रमात पुढील वर्षी वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ या पात्रता परीक्षेबाबतही माहिती दिली जाईल. ‘नीट’ची तयारी कशी करायची याबाबत एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करतील. सलग दोन दिवस तज्ज्ञांकडून करिअरविषयक नवनव्या संधींविषयी माहिती करून देण्यात येणार आहे. दोन्ही दिवसांचे विषय आणि वक्ते सारखेच असणार आहेत. पहिल्या दिवसाचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. तर, कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे करणार आहेत. विषय आणि वक्ते कला क्षेत्रातील वळणवाटा - दिपाली दिवेकर, करिअर समुपदेश, आयव्हीजीएस वाणिज्यमधील करिअर व्यवहार - अमिर अन्सारी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस ललित कलांतील ‘संधी’राग - जयवंत कुलकर्णी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस विज्ञान शाखेतील करिअर ‘विज्ञान’ - विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक प्रायोजक * अॅमिटी युनिव्हर्सिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाला पॉवर्डबाय म्हणून * आयईईआयटी डिझाइन स्टुडिओ’, ‘दिलकॅप महाविद्यालय’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आहेत. याचबरोबर या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण विष्णुदास भावे नाटय़गृह, वाशी विद्यालंकार क्लासेस, शिव पार्वती शॉपिंग कॉम्पलेक्स, नेरूळ रेल्वे स्थानकासमोर, सेक्टर २१, नेरूळ (पू.) विद्यालंकार, ५४ महावीर सेंटर, गोल्डन पंजाब हॉटेलच्या वर, तिसरा मजला, सेक्टर १७, वाशी (या तीन ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपल्‘डेक्कन क्वीन’च्या वाढदिवशी पासधारक ताईंची ‘भाईगिरी’!ाब्ध होतील) प्रवेशिका या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ६७४४०३४७ किंवा ६७४४०३६९