मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे, हॉटेल, पबकडे मुंबईकरांची पावले वळली. त्यामुळे जुहू चौपाटी, मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह येथे संध्याकाळपासून प्रचंड गर्दी होती. परिणामी अनेक भागांत मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत रस्त्यांवर मोठी वर्दळ आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण कुटुंब कबिल्यासह बाहेरगावी गेले आहेत. मात्र ज्यांना काही कारणामुळे पर्यटनस्थळी जाता आले नाही असे मुंबईकर मंगळवारी चौपाट्यांकडे धावले. संध्याकाळपासूनच गिरगाव, दादर, जुहू या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी होण्यास सुरुवात झाली. मुंबईचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या गेट वे ऑफ इंडिया परिसरातही नववर्षाच्या स्वागताचा उत्साह होता. शहरातील ठिकठिकाणची हॉटेल्स, रेस्तराँ, पब यांनी खास पार्ट्यांचे आयोजन (पान ४ वर) (पान १ वरून) केले होते. होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा : नववर्षाच्या पूर्वसंध्येपूर्वी मुंबई पोलिसांची विशेष मोहीम

सीएसएमटी, भायखळा, दादर, घाटकोपर, चर्चगेट, मरिन ड्राईव्ह, चर्नी रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परळ या रेल्वे स्थानकांवरही मोठी गर्दी झाली होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेने रात्री उशिरापर्यंत विशेष लोकलची उपलब्ध करून दिल्या होत्या. गेट वे, जुहू, गोराई, मार्वे यासह अन्य चौपाट्यांच्या ठिकाणी ‘बेस्ट’ने जादा बसही सोडल्या होत्या. त्याचा हजारो प्रवाशांनी लाभ घेतला. स्थानकांवर रेल्वे पोलीस व आरपीएफचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सर्व महिला डब्यांमध्ये गणवेशधारी सुरक्षा जवान होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गर्दीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी आरपीएफ, रेल्वे पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची पाहणी करीत होते. श्वान पथकांद्वारे रेल्वे परिसराची तपासणी करण्यात येत होती. सीएसएमटी, चर्चगेट, दादर या स्थानकांवर गर्दी होऊ नये म्हणून फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली होती. लोकल किंवा रेल्वे परिसरात गर्दी असल्याने कोणत्याही प्रकारचे रिल्स, स्टंटबाजी करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. मद्यापी प्रवाशांमुळे अन्य प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येत होती. मद्यापी प्रवाशांना इतर प्रवाशांपासून दूर बसवण्यात येत होते.

नव्या वर्षाचे सर्वप्रथम स्वागत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होते. न्यूझीलंडमधील ऑकलंड हे नवे वर्ष सुरू होणारे जगातील पहिले मोठे शहर… ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील जगप्रसिद्ध ‘ऑपेरा हाऊस’ आणि त्यालगतच्या ‘हार्बर ब्रिज’च्या आसमंतामध्ये नववर्षाच्या स्वागताला आतषबाजी केली जाते. यंदाही २०२४ला निरोप देताना आणि २०२५चे स्वागत करताना सिडनीचे आकाश रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून निघाले.

हेही वाचा : सोयाबीन खरेदी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२४ला निरोप देण्यासाठी मंगळवारी संध्याकाळपासून जुहू चौपाटीवर मुंबईकरांनी गर्दी केली. बच्चेकंपनीने चार्ली चॅप्लिन झालेल्या एका कलाकाराबरोबर छायाचित्र काढून घेण्यासाठी गर्दी केली.