शिंदे गटाच्या प्रवक्त्या तथा उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बघायला मिळाले. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या व्हिडीओवरून आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरण: आदित्य ठाकरेंचे मित्र साईनाथ दुर्गे ताब्यात, पाच जणांना पोलीस कोठडी

काय म्हणाले नितेश राणे?

“शीतल म्हात्रेंचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. यासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली असून त्या तक्रारीनुसार हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे मानस कुवर आणि अशोक मिश्रा ही दोन व्यक्ती असल्याचं पुढं आलं आहे. हे दोघेही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मास्टरमांईंड कलानगरमध्ये बसला आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. हे जर युवासेनेचे पदाधिकारी असतील तर युवासेनेच्या प्रमुखांनी यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं”, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – VIDEO: शीतल म्हात्रेंच्या व्हायरल आक्षेपार्ह व्हिडीओवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यामागे…”

“…तर आम्ही ते व्हिडीओ बाहेर काढू”

पुढे बोलताना, “जे ठाकरे गटाबरोबर राहतील, ते चांगले. जे त्यांना सोडून गेले, त्यांची बदनामी करण्याचा प्रकार फार पूर्वीपासून सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच मॉर्फ व्हिडीओ तुम्हालाच करता येतो, असं नाही. “तुम्ही जर हा खेळ सुरू करत असाल, तर याचा शेवट आम्हाला करता येतो. आम्हीही रात्री ७.३० नंतरचे काही व्हिडीओ बाहेर काढू. ८ जून रोजीचे काही व्हिडीओ आमच्याकडे सुद्धा आहेत”, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane allegation on thackeray group after shital mhatre morf video viral spb
First published on: 13-03-2023 at 17:21 IST