लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे रुपांतर शनिवारी चक्रीवादळात, तर रविवारी महाचक्रीवादळात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईत या चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. मात्र, मुंबईत या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Indian Team Parade Viral Photos
टीम इंडियाच्या स्वागतासाठी उसळलेला जनसागर पाहून आनंद महिंद्रांनी मरीन ड्राईव्हला दिले नवे नाव; सूर्यकुमार म्हणाला, “तुम्ही…”
Tej Cyclone Alert in Arabian Sea Mumbai
Tej Cyclone: अरबी समुद्रातील चक्रीवादळाचे ‘तेज’ असे नामकरण; कसा असेल दोन्ही चक्रीवादळांचा प्रवास जाणून घ्या…
pooja khedkar ias news in marathi
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!
Abhishek Singh former IAS Officer
Abhishek Singh : पूजा खेडकरांप्रमाणेच आणखी एक माजी IAS अधिकारी अपंगत्वाच्या दाखल्यावरून चर्चेत! डान्स आणि जिमच्या व्हिडीओमुळे गोत्यात?
malpractice, MPSC examination, students
एमपीएससी परीक्षांमध्येही प्रमाणपत्रांचे गैरप्रकार? एमपीएससीचे म्हणणे काय?
Mumbai rain updates marathi news
Mumbai Rain Alert: मुंबईत पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता
Video viral of man stuck in a lift on social media funny reaction
लिफ्टमध्ये अडकला माणूस पण मागे वळताच…; नेमकं घडलं तरी काय? VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?

चक्रीवादळाचा तडाखा मुंबई शहराला बसणार असल्याच्या अफवा व्हॉट्स ॲप, एक्सच्या माध्यमातून पसरविण्यात येत आहेत. दरम्यान, चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा कोणताही परिणाम मुंबई, तसेच राज्यात पहायला मिळणार नाही. याबाबत कोणताही इशारा जारी केलेला नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

आणखी वाचा-मुंबई : दाऊदशी संबंधित गुन्ह्यांत अडकल्याचे भासवून व्यावसायिकाची सायबर फसवणूक

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३५.६ अंश सेल्सिअस, तर, सांताक्रूझ केंद्रात ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील तीन-चार दिवस कोरडे वातावरण राहील. तर धुळे, जळगाव भागात शनिवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मोसमी वाऱ्यांची प्रगती

मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी मालदीव, कोमोरीन भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत मोसमी वारे मध्य बंगालचा उपसागर, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.