मुंबईतील नरिमन पॉईंट येथील ट्रायडेंट हॉटेलला आज पहाटे भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आले होते. या आगीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु, या आगीमागचे कारण स्पष्ट झाले नव्हते. अखेर, या आगीमागचे खरे कारण समोर आले आहे.

“नरिमन पॉईंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये आग लागली नव्हती. येथे नेहमीप्रमाणे ड्रील घेण्यात येत होते. त्यामुळे येथील चिमणीतून थोडा धूर निघत होता. परिणामी आग लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आगीचे वृत्त कळताच आम्ही आमच्या टीमलाही घटनास्थळी रवाना केलं होतं. परंतु, तिथे आग लागली नसल्याचं स्पष्ट झालं आहे”, अशी प्रतिक्रिया मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी पहाटे ६.५० ते ७.१० च्या दरम्यान ट्रायडेंट हॉटेलच्या टेरेसवरून धूर येत होता. रविवारी सकाळी मॉर्निंग अॅक्टिव्हिटीसाठी नागरिक समुद्र किनारी जमले होते. हॅप्पी स्ट्रीट उपक्रमासाठी जमलेल्या लोकांनी त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून धुराचे दृश्य टिपले. त्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत ट्रायडेंटमध्ये आग लागल्याची अफवा पसरली होती.